सिल्लोड, (प्रतिनिधी): उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सिल्लोड येथे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर अ. सत्तार यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, दुर्गाबाई पवार, विनोद मंडलेचा यांची उपस्थिती होती.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड शहराचा झालेला विकास आणि करण्यात येणारा विकास हे मुद्दे घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही मतदारांना मते मागणार आहोत. विकास हाच आमचा अजेंडा असेल असे सांगत मतदारांचा आमच्या प्रती असलेला विश्वास, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता शिवसेनेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास अब्दुल समीर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.














